लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   साधक
WFTW Body: 

जेव्हा येशू 30 वर्षांचा होता तेव्हा पिता स्वर्गातून त्याच्याविषयी जाहीररित्या पुढील शब्द बोलला, ''हा माझा परमप्रिय पुत्र आहे. ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे'' (मत्तय 3:17). ही वेळ अशी होती की ह्या वेळेपर्यंत येशूने एकही चमत्कार केला नव्हता व एकही संदेश दिला नव्हता.

तर मग त्याच्या ठायी अशी कोण्ती गोष्ट होती की देवाने त्याला मान्यता दिली? त्याने केलेली सेवा तर नक्कीच नव्हती, कारण त्याने एकदाही सार्वजनिक ठिकाणी संदेश दिला नव्हता. 30 वर्षे तो ज्या पद्धतीने जीवन जगला तेच त्यामागील कारण होते.

आपल्या सेवेच्या यशाच्या आधारावर देव आपल्याला मान्यता देत नाही तर दैनंदिन जीवनात येणार्या परीक्षेंवर व मोहांवर आपण विश्वासूपणे मात करतो या आधारावर देव आपल्याला मान्यता देतो

गुप्तप्णे जीवन जगत असलेल्या येशूच्या तीस वर्षांच्या जीवनाविषयी आपल्याला केवळ दोन गोष्टी सांगण्यात आल्या (मंदिरातल्या घटनेव्यतीरिक्त) आणि त्या म्हणजे - ''तर तो सर्वप्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता, तरी निष्पाप राहिला'' (इब्री 4:15) आणि ''त्याने स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही'' (रोम 15:3).

त्याने विश्वासपूर्वक प्रत्येक क्षणी मोहाला प्रतिरोध केला व कुठल्याही परिस्थितीत त्याने स्वतःचा विचार केला नाही. हीच गोष्ट होती ज्यामुळे पिता संतुष्ट होता.

आपण जे साध्य केले त्याद्वारे जगिक लोक व दैहिक विश्वासणारेच प्रभावीत होतील परंतु देव आपल्या शीलाद्वारे व आचरणाद्वारे प्रभावीत होतो. देवाच्या मान्यतेसाठी केवळ आपले शीलच महत्वाचे आहे. तर मग, आपण जर देवाचे आपल्याविषयी काय मत आहे हे जाणू इच्छितो तर आपण आपल्या सेवेत जी साध्यता मिळविली आहे ती आपल्या मनातून काढून टाकावी व पापाविषयी व स्वकेंद्रितपणाविषयी आपल्या वृत्तीचे मुल्यांकन करावे. केवळ तीच आपल्या आत्मिक स्थितीची खात्रीदायक मोजपट्टी व प्रमाण आहे.

अशाप्रकारे, रोग बरे करणारे वक्ते जे जगभर फिरतात व व्यस्त माता ज्या कधीही आपल्या घराच्या बाहेर पडत नाहीत, त्यांना सुद्धा देवाची तेवढीच मान्यता मिळण्याची संधी असते.

याच कारणामुळे ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर आपल्याला असे दिसेल की जे याठिकाणी ख्रिस्ती जगात पहिले आहेत ते शेवटले होतील व जे याठिकाणी शेवटले आहेत ते पहिले होतील (कारण त्यांच्याकडे मिरविण्यासारखी सेवा नसते)!