WFTW Body: 

'कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणें नव्हे, तर ज्यानें मला पाठविलें त्याच्या इच्छेप्रमाणें करावें म्हणून स्वगर्ांतून उतरलों आहें'' (योहान 6:38). पृथ्वीवर येण्यामागील कारण येशूने स्वतः याठिकाणी सांगितले आहे. या एका वाक्यामध्ये आपल्याला सविस्तरपणे सांगण्यात आले आहे की पृथ्वीवर येशू प्रत्येक दिवस देवाच्या इच्छेप्रमाणे जगला. नासरेथ गावातील येशूच्या तीस वर्षांच्या कालावधीविषयी बायबलमध्ये लिहिलेले नाही. परंतु, या वाक्यात येशूने त्या तीस वर्षांमधील प्रत्येक दिवसाविषयी सांगितले आहे की त्याने प्रत्येक दिवशी व प्रत्येक क्षणाला देवाची इच्छा पूर्ण केली आहे. त्याने स्वतःच्या इच्छेचा त्याग केला व देवाची इच्छा पूर्ण केली.

सार्वकालिकतेपासून येशू पित्यासोबत स्वर्गात असताना त्याला स्वतःच्या इच्छेचा त्याग करावा लागला नाही कारण त्याची इच्छा व पित्याची इच्छा सारखीच होती. परंतु येशू देहधारण करून पृथ्वीवर आला तेव्हा त्याच्यातील देहाची इच्छा पित्याच्या इच्छेविरुद्ध होती. कारण देहरूपात तो पूर्ण मानवसुद्धा होता. पित्याची इच्छा पूर्ण करण्याकरिता येशूला प्रत्येक वेळी स्वतःच्या इच्छेचा त्याग करावा लागला. हा वधस्तंभ येशूने वाहिला. पृथ्वीवर जीवन जगत असताना त्याने स्वतःच्या इच्छेला वधस्तंभावर खिळले आणि तो आपल्याला हाच वधस्तंभ वाहण्यास सांगतो. तो आपल्याला सांगतो की आपण त्याच्या मागे जायचे असल्यास हा वधस्तंभ आपण वाहावा.

येशू सतत स्वइच्छेचा त्याग करीत होता म्हणून तो आत्मिक जीवन जगू शकला. आपण जर स्वइच्छेचा त्याग करीत राहिलो तर आपण देखील आत्मिक होऊ व आत्मिक जीवन जगत राहू. प्रतिदिवशी आपण विभिन्न निर्णय घेतो. पैशाविषयी, वेळेविषयी, संबंधांविषयी किंवा एखादे पत्र कसे लिहायचे त्याविषयी आपण निर्णय घेत असतो. एखाद्याच्या वागणुकीला कशी प्रतिक्रिया द्यायची, किती वेळ देवाचे वचन वाचायचे व किती वेळ प्रार्थना करायची व किती प्रमाणात सेवा करायची याविषयीचे निर्णय आपण रोज घेत असतो. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत लोकांच्या शब्दांना व वर्तनाला आपण प्रतिक्रिया देत असतो. आपल्याला जाणीव नसेल परंतु, रोज आपण हजारो निर्णय घेतो. या निर्णयामध्ये आपण एक तर स्वतःला संतोषवितो किंवा देवाला संतोषवितो.

आपल्या अनेक हालचाली पुष्कळ वेळा कळतपणे घेतलेल्या निर्णयांचे परिणाम नसतील. परंतु, त्यात देखील आपण एकतर स्वतःला संतोषवितो किंवा देवाचे गौरव करितो. नकळतपणे घडत असलेल्या हालचाली कळतपणे घेतलेल्या निर्णयांमुळे असतात. शेवटी आपले सर्व निर्णय मिळून आपल्याला आत्मिक बनवितात किंवा दैहिक बनवितात.

त्या हजारो निर्णयांविषयी विचार करा जे आपण परिवर्तनापूर्वी घेतले. ज्यांनी रोज सातत्याने स्वतःच्या इच्छेचा नकार केला व देवाची इच्छा पूर्ण केली ते आत्मिक झाले. परंतु ज्यांना पापांची क्षमा प्राप्त झाली परंतु, नंतर ज्यांनी स्वतःच्या इच्छेला अधिक महत्व दिले आणि देवाच्या इच्छेची पर्वा केली नाही ते दैहिक झाले. आज आपण जे आहोत ते आपल्या मागील निर्णयांमुळे आहोत.

आज जर तुम्ही नम्र, पवित्र व प्रेमळ असाल तर मागील वर्षांमध्ये घेतलेल्या अनेक निर्णयांचा हा परिणाम आहे.

देवाची ओळख झाल्याबरोबर आत्मिकता प्राप्त होत नाही. स्वतःच्या इच्छेचा नकार करून सातत्याने रोज आणि रोज व वर्षानुवर्षे देवाची इच्छा पूर्ण करीत राहिल्यास आपण आत्मिक होत जाऊ.