लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

विवेक

आपण जसेजसे काळाच्या अखेरीस येऊ तसेतसे मंडळीमध्ये पवित्र आत्म्याचे कार्य अधिकाधिक वाढेल. फसवणूक करणारे आत्मेदेखील जगात अधिकाधिक कार्य करतील. त्यामुळे आपल्याला फसायचे नसेल तर आपण खालील गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे:

(१) भावनिक बनावट (२) अतिरेकीपणा (३) परूशीवाद आणि (४) पंथवादी दृष्टिकोन.

शत्रू नेहमीच तिथे काम करतो जिथे पवित्र आत्मा काम करतो. त्यामुळे तुम्ही जे पाहता व ऐकता ते सर्व गिळू नका. विवेकी व्हा. पवित्र आत्म्याच्या वावरासोबत कोलाहल आणि भावना असू शकतात - आणि यामुळे काही लोकांना त्यांच्या मानवी अडथळ्यांपासून आणि माणसांच्या भीतीपासून मुक्त होण्यास मदत होते. आपण आपल्या भावनांचे अवमूल्यन करत नाही, कारण ते देवाने आपल्या दिलेल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहेत. पण त्याचवेळी, आपण त्यांना अतिमहत्त्व देऊ नये, कारण देव भावना नव्हे तर हृदय पाहतो. प्रार्थना करताना आवाज वाढवणे चांगले आहे, कारण यामुळे तुम्हांला तुमच्या आजूबाजूच्या इतरांची जाणीव कमी होण्यास मदत होईल. प्रार्थना करताना डोळे बंद केल्यासारखेच हे आहे, जेणेकरून तुम्ही अधिक चांगले लक्ष केंद्रित करू शकता आणि तुमच्या आजूबाजूच्या इतरांमुळे तुम्ही विचलित होणार नाही. अशा कृतींमुळे तुमच्या प्रार्थना अधिक आध्यात्मिक होणार नाहीत , पण त्या तुम्हांला तुमच्या आजूबाजूच्या परिसरापासून मुक्त होण्यास मदत करतात. पवित्र आत्म्याचे सामर्थ्य ओरडण्याद्वारे नव्हे, तर पवित्र जीवन, मंडळीमधील एक सामर्थ्यशाली सेवाकार्य आणि तुमच्या कार्याच्या ठिकाणी प्रभूची न लाजता दिलेली साक्ष यांतून प्रगट होते.

मानवी आत्म्यात प्रचंड सामर्थ्य आहे (बौद्धिक शक्ती, भावनिक शक्ती आणि इच्छाशक्ती). आणि पुष्कळ लोक याचा (योगाप्रमाणे)फायदा घेतात आणि ती पवित्र आत्म्याची शक्ती आहे अशी कल्पना करतात. अशा शक्तीने तुमची फसवणूक होता कामा नये. पवित्र आत्मा नेहमीच ख्रिस्ताचा गौरव करेल - माणसांचा किंवा अनुभवांचा नव्हे. त्यामुळे हा एक निश्चित मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही बनावटपणा शोधू शकता.

शिस्त
“कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे.”( २ तीमथ्य १:७) पवित्र आत्मा तुमच्या जीवनातील सर्व भय आणि भित्रेपणा दूर करेल आणि त्याजागी सामर्थ्य, प्रेम आणि शिस्त या गोष्टी ठेवेल. शिस्त असल्याशिवाय कोणीही खऱ्या अर्थाने आध्यात्मिक बनू शकत नाही. आत्म्याचे फळ इंद्रियदमन आहे (गलती ५:२३). बेशिस्त जीवन हे गळणाऱ्या भांड्यासारखे असते. ते कितीही वेळा भरले तरी ते पुन्हा रिकामे होईल. ते वारंवार भरावे लागेल. तुम्ही तीन क्षेत्रातील वापरत अधिकाधिक शिस्तबद्ध होण्याचा प्रयत्न केला पाहिजे: (१) तुमचे शरीर, (२) तुमचा वेळ आणि (३) तुमचा पैसा

रोम ८:१३ म्हणते की आपण आत्म्याद्वारे शरीराची कृत्ये ठार मारली पाहिजेत. ही अंतःकरणातून केलेली कृत्ये नाहीत - कारण अशी कृत्ये जाणूनबुजून केलेली पापे असतात. ही कृत्ये शरीराकडून घडतात, कारण आपण शरीराला बेशिस्त होऊ देतो - उदाहरणार्थ, अतिखाणे, अति झोप, आळशीपणा किंवा वाचाळपणा इत्यादी क्षेत्रांत; पवित्र आत्म्याला विशेषकरून आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करायची आहे.

इफिस ५:१६ आपल्याला आपल्या वेळेचा सदुपयोग करायला सांगते. वाया जाणारा बराचसा वेळ वाचवता येईल आणि तुम्हांला शिस्त लागली तर शास्त्रवचनांचा अभ्यास करण्यासाठी त्याचा उपयोग करता येईल. मला असे म्हणायचे नाही की तुम्ही आराम करू नये किंवा खेळ खेळणे वगैरे करू नये. तुम्ही विरक्त होऊ नका, कारण ते तुम्हांला बंधनात अडकवेल. पण वेळेचे “तुकडे तुम्ही कोठे गोळा करू शकता” याचा विचार करा, जसे शिष्यांनी भाकरीचे तुकडे गोळा केले, जेणेकरून "काही फुकट जाऊ नये." (योहान ६:१२). तुमच्या वेळेचा पुरेपूर फायदा उठवण्यासाठी स्वतःला शिस्त लावा, पण त्यासाठी वेडे होऊ नका! विश्रांतीही घ्या.

लूक १६:११ मध्ये येशूने म्हटले की धनाविषयी अविश्वासू असलेल्यांना देव खरी आध्यात्मिक संपत्ती देणार नाही. धनाविषयी नीतिमान असणे ही पहिली पायरी आहे - फसवणूक न करणे, सर्व कर्जे फेडून टाकणे इत्यादी . पुढची पायरी म्हणजे विश्वासू असणे - अपव्यय, उधळपट्टी, निरुपयोगी ऐषोराम आणि सर्व अनावश्यक खर्च टाळणे . हे लक्षात असू द्या की जे पवित्र आत्म्याला आपल्या जीवनाला शिस्त लावू देतात त्यांना ख्रिस्ती जीवनात देवाचे सर्वोत्तम मिळत.