लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

दररोज आपण विविध बाबींविषयी निर्णय घेतो. आपण आपला पैसा किंवा आपला मोकळा वेळ कसा घालवणार आहोत, किंवा एखाद्याशी अथवा एखाद्यासंबंधी कसे बोलावे, किंवा एखादे विशिष्ट पत्र कसे लिहावे किंवा दुसर्‍याच्या वागण्यावर कशी प्रतिक्रिया द्यावी किंवा शास्त्राचा अभ्यास करण्यात, प्रार्थना करण्यात किंवा मंडळीची सेवा करण्यात किती वेळ द्यावा इत्यादिसंबंधात निर्णय घेतो. आम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्या आसपासच्या लोकांच्या वागणुकीवर काही विशिष्ट प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त करतो. आपल्याला कदाचित ते लक्षात येत नसेल, परंतु आम्ही दररोज किमान शंभर निर्णय घेतो - आणि त्या प्रत्येक निर्णयामध्ये आपण स्वतःला किंवा देवाला संतुष्ट करण्यासाठी निर्णय घेतो.

आमच्या बर्‍याच कृती या जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयांचा परिणाम नसतात. परंतु तरीही, आम्ही त्या दोन मार्गांपैकी एका मार्गाने करतो - एकतर स्वतःला संतुष्ट करण्यासाठी किंवा देवाचे गौरव करण्यासाठी. आपल्या जाणीवपूर्वक निर्णय घेण्याद्वारे आपल्या नकळत होणाऱ्या कृती निर्धारित केल्या जातात. अखेरीस, या निर्णयांची गोळाबेरीज ठरवते की आपण आध्यात्मिक आहात की दैहिक.

आपले प्रथमतः परिवर्तन झाल्यापासून आपण घेतलेल्या लाखो निर्णयांचा विचार करा. ज्यांनी जाणीवपूर्वक आणि सातत्याने दररोज बर्‍याच वेळा स्वइच्छा नाकारण्याचे आणि देवाच्या इच्छेनुसार वागण्याचे निवडले आहे ते आध्यात्मिक झाले आहेत. दुसरीकडे, ज्यांनी केवळ त्यांच्या पापाची क्षमा केल्याबद्दल आनंद केला आहे आणि म्हणूनच ज्यांनी स्वतःला बहुतेक वेळेस संतुष्ट केले आहे ते दैहिक आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या निर्णयांनी शेवटी ठरवले की तो काय बनला आहे.

गेल्या अनेक वर्षांत जीवनाच्या विविध परिस्थितीत घेतलेल्या हजारो निर्णयांद्वारे आपण जितके निवडले तितकेच नम्र, पवित्र आणि प्रेमळ आहोत. त्यांचे परिवर्तन झाल्याच्या दहा वर्षांनंतर, दोन भावांच्या आध्यात्मिक स्थितीचा विचार करा (दोघेही एकाच दिवशी ख्रिस्ताकडे आले). एक आता आध्यात्मिक समजूतदार असलेला एक परिपक्व बंधू आहे, ज्याच्यावर देव मंडळीमध्ये जास्त जबाबदारी सोपवू शकतो. दुसरे अद्याप एक विवेकबुद्धी नसलेले मूल आहे, आणि सतत इतरांकडून त्याला आध्यात्मिक आहार आणि प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. काय आहे ज्यामुळे या दोघांमध्ये असा फरक झाला आहे? उत्तर असे आहे: त्यांनी आपल्या ख्रिस्ती जीवनाच्या दहा वर्षांच्या प्रत्येक दिवसात घेतलेले लहानसहान निर्णय.

जर अशाच प्रकारे पुढे चालू राहिल्यास, आणखी १० वर्षांमध्ये, त्यांच्यामधील फरक आणखी स्पष्ट होईल. आणि अनंतकाळपर्यंत, त्यांचे वैभवाचे भिन्न अंश २०००-वॅट बल्ब आणि ५-वॅट बल्बद्वारे उत्सर्जित केलेल्या प्रकाशाइतके भिन्न असतील!! "ताऱ्याताऱ्यांच्या तेजांत निरनिराळे प्रकार असतात" (१ करिंथ १५: ४१). तेव्हा कमकुवत इच्छाशक्तीचे होऊ नका. देवाला नेहमी संतुष्ट करण्यासाठी आपल्या इच्छेचा उपयोग करा. जर आपण आतापासून विश्वासू असल्याचे निश्चित केले तर आपल्याला अनंतकाळाच्या जीवनात दु:ख होणार नाही, जरी आपण आतापर्यंत आपल्या मागील जीवनात कितीही वेळेस अपयशी झाला असला तरी आपल्याला आपल्या आसपास असे अनेक विश्वासणारे सापडतील ज्यांना अशा प्रकारच्या शिस्तबद्ध, मनापासून जीवन जगण्यात रस नाही. त्यांचा न्याय करु नका. परुशी होऊ नका आणि त्यांचा तिरस्कार करू नका. आपल्या स्वतःच्या कामात लक्ष द्या आणि त्यांच्या कार्यात लुडबुड करू नका. पण वेगळे असा. येशू एकटाच आपले उदाहरण होऊ द्या. त्या दिवसाचा सतत विचार करा जेव्हा तुम्हाला ख्रिस्ताच्या सिंहासनापाशी आपल्या जीवनाचा हिशेब द्यावा लागेल.