लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   शिष्य पुरूष
WFTW Body: 

यहेज्केलच्या 4 थ्या अध्यायामध्ये आपण बघतो की अनेक चिन्हांद्वारे प्रभुने यहेज्केलला बोध केला. प्रभुने त्याला सर्वप्रथम वीट मांडण्यास सांगितले व तिच्या एका बाजूस तिनशे नव्वद दिवस निजण्यास सांगितले व दुसर्‍या बाजूस 40 दिवस निजण्यास सांगितले. बाबेलमध्ये असलेल्या यहूदाच्या लोकांकरिता यहेज्केल एक बोधात्मक चिन्ह होणार होता. यातून देव त्यांना दाखवू इच्छित होता की देव यरूशलेमेतील लोकांना, इस्राएली लोकांना व यहूदाच्या लोकांना शिक्षा करणार आहे. देव त्याच्या संदेशाचे प्रात्यक्षिक दाखवीत होता

देवाने यहेज्केलला विचित्र गोष्टी करण्यास सांगितले. देवाने त्याला अन्न शेणाने भाजण्यास सांगितले, दाढी व डोक्यावरील केस काढण्यास सांगितले व केसांचा काही भाग जवळ ठेवण्यास सांगितले जेणेकरून इस्राएली लोकांना समजावे की त्यांच्यापैकी फार थोडे वाचतील (5:1-4). तुम्हाला संदेष्टा व्हायचे असेल तर तुम्हाला आपले सौंदर्य त्यागावे लागेल. जर देव तुम्हाला मुंडण करण्यास सांगेल तर तसे तुम्हाला करावे लागेल. तेव्हा तुम्ही सबब सांगू शकणार नाही, ''देवा मुंडण केल्यावर मी देखणा दिसणार नाही.'' यहेज्केलला शेणाने अन्न भाजावे लागले. यहेज्केल याजक असता तर त्याचे यापेक्षा सोपे जीवन असते. तो संदेष्टा झाल्यामुळे त्याला जेवणाच्या सवयीमध्ये बदल करावा लागला व बाह्य देखाव्यात बदल करावा लागला. लोक काय म्हणतील ह्याची त्याला पर्वा करायची नव्हती. आता त्याच्यापुढे देवाला संतोषविणे हेच ध्येय उरले होते.

तुम्ही देवाचे दास होऊ इच्छिता तर देवाकडे अन्नाविषयी किंवा तुमच्या देखाव्याविषयी तक्रार करू नका. देव देतो त्याचा स्वीकार करा व तो सांगेल ते करा. तुमच्या जीवनातील प्रत्येक लहानसहान गोष्ट देवासाठी महत्वाची आहे. मी 22 वर्षांचा तरुण होतो तेव्हा मी देवाचे वचन गाजविणे सुरू केले. त्या वयात माझे केस जाऊ लागले. केस जाऊ नये म्हणून देवाकडे मी प्रार्थना केली नाही. कदाचित देवाची तशी इच्छा असावी. या समस्येमागील उत्तर मला मिळाले. त्या वयात माझ्याशी जे जे घडत होते त्याचा संबंध मी देवाच्या सेवेशी लावत होतो. मी केवळ 22 वयाचा होतो परंतु, माझे केस गेल्यामुळे मी 30-35 वयाचा दिसत होतो व लोकांसमोर उभा राहून बोलत असे. मला अर्ध्या वयाचे समजून ते माझे बोलणे लक्षपूर्वक ऐकत असत. जर मी 22 वयाचा दिसलो असतो तर त्यांनी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले असते. अशाप्रकारे मला कळले की माझ्या लहानसहान गोष्टीमागे देखील देवाचा विशेष हेतु असतो.

तुम्ही तरुणपणीच प्रभुकरिता पूर्णपणे विकल्या गेला व पुढील प्रार्थना प्रभुकडे केली तर माझी खात्री आहे की तुम्हाला प्रभु विशेष असे जीवन देईल : ''प्रभु, मला माझ्या अन्नात व देखाव्यात रूची नाही. मी तुझ्या पवित्र आत्म्याने भरू इच्छितो. मी तुझी सेवा करावी म्हणून माझा अभिषेक कर. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हा अभिषेक मजवर असावा. मी इतर प्रचारकांचे अनुकरण करू इच्छित नाही. येशू मी तुझ्याकडे बघू इच्छितो. मी बायबलमधील संदेष्ट्यांच्या जीवनातून बोध घेऊ इच्छितो. मी पूर्ण मनाने तुझ्यामागे चालू इच्छितो.'' तुम्ही अशी प्रार्थना केली तर तुम्हाला अद्भुत जीवन प्राप्त होईल व देव तुम्हाला त्याचे वचन शिकवील व तुमच्याशी बोलेल. तो तुम्हाला लोकांना सांगण्यासाठी शब्द देईल. परंतु, तुम्ही त्याच्यासाठी पूर्णपणे विकले जावे. पृथ्वीवर तुमच्या महत्वकांक्षा व इच्छा नसाव्या. तुम्ही पैसा, मान व प्रसिद्धीचा लोभ धरू नये. तुमच्याकडे जे काही आहे, शरीर, पसै ा, वळे व कुटूबं ते सर्व देवाकरिता असावे. तुमची अशी अपेक्षा असेल तर देव तुमच्या करवी जे करणार आहे त्याला सीमा नसणार