WFTW Body: 

ओबद्याच्या पहिल्या अध्यायामध्ये ओबद्या अदोमवरील देवाच्या न्यायाविषयी बोलतो. अदोम आपल्या देहाचे प्रतिक आहे, म्हणून ही भविष्यवाणी देहाच्या नाशाविषयी सांगते. याठिकाणी अदोमाच्या गर्वाविषयी बोलण्यात आले, ''खडकाच्या कपारींत उच्च स्थानीं वसणार्या , तूं आपल्या मनांत समजतोस कीं मला खालीं जमिनीवर कोण पाडणार? या तुझ्या मनाच्या अभिमानानें तुला दगा दिला आहें. तूं गरूडाप्रमाणें आपलें घरटें उंच केलें, तुझें घरटें तार्यांगमध्यें बांधिलें, तरी मी तुला तेथून ओढून खालीं पाडीन, असें परमेश्वर म्हणतो'' (ओबद्या 1:3-4).

देह नेहमी स्वतःला उंचविण्याचा प्रयत्न करितो. परंतु, देव असा गर्व पूर्णपणे नष्ट करितो. रात्री चोर आले तर ते तुम्हाला लुटून जातील पण सर्व नेणार नाहीत. परंतु, याठिकाणी म्हटले आहे, ''एसावाची मालमत्ता कशी धुंडाळून काढण्यांत आली आहे! त्याचे गुप्त निधि कसे हुडकण्यांत आले आहेत! '' (वचन 6). यातून आपल्याला लागूकरण होते की आपल्यातील सर्व देहविषयक गोष्टी कानाकोपर्याहतून हुडकण्यांत येतील. देहाच्या प्रत्येक वासना पूर्णपणे नष्ट करण्यात येतील व त्यावर पवित्र आत्म्याचा विजय होईल.

अदोमाला शिक्षा होत होती कारण अदोमाने आपल्या जवळच्या नातेवाईकांविरुद्ध, इस्राएली लोकांविरुद्ध दुष्टाई केली. इस्राएली लोक संकटात असता, त्यांना बंदिस्त करून नेत असता अदोमाने इस्राएलाला त्यागले. असे म्हटले आहे, ''ज्या दिवशीं तूं अलग राहिलास, ज्या दिवशीं परके त्याची मालमत्ता घेऊन गेले, परदेश्यांनीं त्याच्या वेशींत शिरून यरूशलेमेविषयीं चिठ्या टाकिल्या. त्या दिवशीं तूंि ह त्यांतला एक होतास''(वचन 10,11). ते इस्राएलाचे शत्रु असल्यासारखे वागले. अदोमाने इस्राएलाची काहीच मदत केली नाही.

दुष् टाई करण्याचे पाप असते व काहीही न करण्याचे देखील पाप असते. जेव्हा आपण पापाविषयी विचार करतो तेव्हा काही वाईट कृत्ये करणे म्हणजेच आपण पाप समजतो. परंतु, चांगल्या शोमरोन्याच्या गोष्टीमध्ये याजक व लेवी ह्यांनी काही करून पाप केले नाही, त्यांनी त्या जखमी माणसाला मारले नाही तर त्यांनी त्याची दखल न घेण्याचे गंभीर पाप केले. त्यांचे पाप असे होते की त्या जखमी माणसाची मदत करण्याकरिता त्यांनी आपला हात पुढे केला नाही. गरजवंतांची मदत न करणे म्हणजे पाप आहे ह्याची जाणीव तुम्हाला आहे का? हे दुर्लक्ष करण्याचे पाप आहे, टाळण्याचे पाप आहे. जे करायला हवे होते ते न करण्याद्वारे अदोमाने देवाच्या दृष्टीत गंभीर पाप केले. अदोमाचे दुसरे पाप म्हणजे इस्राएलाला बंदिस्त करून नेत असता अदोमाला आनंद वाटला (वचन 12). जे लोक तुम्हाला आवडत नाही त्यांचे वाईट झाले असता तुम्हाला आनंद वाटतो का? हे देखील पाप आहे. कोण् ााचे वाईट होत असता आपण आनंद करू नये. एवढेच नव्हे तर अदोमाने असहाय्य झालेल्या इस्राएलावर आक्रमण केले (वचन 14). त्यांनी इस्राएलाच्या शत्रुंना साथ दिली. शेवटी प्रभु, इस्राएलाच्या पुनःवसनाविषयी बोलला. इस्राएलाच्या पुनःवसनाविषयी जवळजवळ सर्वच संदेष्टे बोलले आहेत. एके दिवशी यरूशलेम सुटून आलेल्यांचे शरणस्थान होईल असे म्हटले आहे (वचन 17). यरूशलेम पवित्र स्थान होईल असे म्हटले आहेइस्राए ली लोकांना परत वतन मिळणार असे भविष्य करण्यात आले आहे. अशी भविष्यवाणी करण्यात आली की प्रभुकरिता इस्राएल जळता अग्नी होईल व अदोम सुकलेले शेत होईल. ''यरूशलेमेतून बंदिवान करून सफारदात नेण्यात आलेले लोक दक्षिणेच्या नगराचा ताबा घेतील. एसावाच्या पहाडाचा न्याय करायला उद्धारकर्ते सीयोन डोंगरावर येतील आणि राज्य परमेश्वराचे होईल'' (वचन 21). आज देवाने आपल्याला मुक्त करणारे होण्याकरिता पाचारण केले आहे. देवाच्या मार्गापासून पथभ्रष्ट झालेल्या लोकांना परत मार्गावर आणण्याचे पाचारण आपल्याला झाले आहे. आपण त्यांना राजाविषयी सांगून परत राजाकडे येण्याचे आमंत्रण द्यावे.

अदोमाच्य ा पतनामागील कारण काय? ''या तुझ्या मनाच्या अभिमानानें तुला दगा दिला आहें'' (वचन 3). जेव्हा आपल्या मनात गर्व येतो तेव्हा आपली आत्मिक फसवणूक होण्याकरिता आपण आपले मन उघडतो. गर्व हा सैतानाचा स्वभाव आहे व तो फसवितोच. ज्या क्षणी तुम्हाला कोणत्या गोष्टीचा गर्व येतो त्याच क्षणी सैतान तुमचा हात धरतो. तुमच्या मनात देखणे दिसण्याचा, बुद्धिमत्तेचा, धार्मिकतेचा, बायबलच्या ज्ञानाचा किंवा कोणत्याही गोष्टीचा गर्व येऊ शकतो. मग सैतान तुमचा हात धरून म्हणतो, ''आपल्या दोघांची चांगली मैत्री झाली आहे.'' येशू ख्रिस्त हा पृथ्वीवर सर्वात नम्र व्यक्ती होऊन गेला. ज्या क्षणी तुम्ही ख्रिस्तासारखे स्वतःला नम्र करता त्याच क्षणी ख्रिस्ताची व तुमची मैत्री होते.

गर्व हा व्यभिचारापेक्षा घातक आहे कारण व्यभिचार बाह्य स्वरूपाचे पाप आहे. बाह्य स्वरूपाच्या पापांपेक्षा गुप्त आंतरीक पाप अधिक गंभीर असतातओबद्य ा ताकीद देत आहे की आपल्यातील गर्व आपल्याला फसविणार. या ताकीदीतून आपण बोध घ्यावा. जे लोक देहाचे गुलाम झाले आहेत त्यांना आपण सांगावे की येशू त्यांना पूर्णपणे बंधमुक्त करू शकतो.