WFTW Body: 

काइनाच्या मागार्व र चालणार्यांविषयी यहूदा बाले तो (यहूदा 11). ते कोण आहते? जे आपल्या भावाचे बरे करीत नाहीत. देवाने काइनाला सांगितले की त्याने बरे केले नाही (उत्पत्ती 4:7). आपण सर्वांनी याविषयी आत्मिक चाचणी करणे गरजेचे आहे.

तुम्ही प्रामाणिकपणे असे म्हणू शकता का की आपल्या मंडळीतील लोकांचे व त्यांच्या कुटुंबांचे तुम्ही हितचिंतक आहात? इतर विश्वासणार्यांचे अगदी चांगले व्हावे असे तुम्हाला वाटते का? तमु च्या शोजार्यांचे, तमुच्या शत्रुंचे व ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे किंवा दुःखविले आहे त्यांचे अगदी चांगले व्हावे असे तुम्हाला वाटते का?

इतरांचे हीत झाल्यावर जर तुम्हाला वाईट वाटत असेल किंवा इतरांचे वाईट झाल्यावर तुम्हाला आनंद होत असेल तर तुमच्यातील ही वृत्ती काय दर्शविते? याचा अर्थ असा की तुमच्यामध्ये आदामाचे जीवन जिवंत आहे व सक्रीय आहे.

तुम्ही काइनाच्या मार्गावर आहात अशी जाणीव तुम्हाला होत असेल तर तुम्ही प्रमाणिक आहात. तुमच्यामध्ये आदामाचे जीवन आढळल्याबरोबर तुम्ही ते वधस्तंभावर खिळण्याकरिता द्यावे. असे केल्यावरच देव तुमचा अभिषेक करील आणि पवित्र आत्मा सदोदीत तुमच्या सोबत राहील.

गव्हाचा दाणा जमीनीवर पडला आणि मेला तरच तो पिक देतो. जो आपला दहे स्वभाव मरू देतो ताचे फळ देतो. तो इतरांचे हीत करितो. जे बरे तेच तो करितो. तो स्वार्थाकरिता क्रोधीत होत नाही व भांडण करीत नाही. तो स्वतःकरिता डोळ्यात एक थेंबसुद्धा अश्रू येऊ देत नाही. स्वतःकरिता जो मेलेला असतो तो कबरेतील प्रेतांप्रमाणे असतो ज्यांच्या डोळ्यात अश्रू येत नाहीत व जे स्वतःकरिता रडत नाहीत.

काइनाने बरे न केल्यामुळे तो संतापला व त्याचे तोंड उतरले. आपल्याला कळणार देखील नाही; परंतु, आपल्या अंतःकरणातील भावना आपल्या चेहर्यावर उमटतात. तुमची इतरांप्रती चांगली वृत्ती असेल तर तुमच्या चेहर्यावर प्रभूचा आनंद दिसेल. अनेक विश्वासणारे काइनाच्या मार्गावर चालत आहेत. त्यांच्या चेहर्यावरील स्मीत खोटे असते तरी देखील ते केवळ ओठांनी ''प्रेस दी लॉर्ड'' म्हणतात. इतर विश्वासणार्यांप्रती त्यांची वृत्ती निट नसते. इतरांचे बरे करण्याकडे त्यांचा कल नसतो.

जेव्हा लोक तुमच्याविरुद्ध उभे होतात व तुमचा विरोध करितात तेव्हा त्यांचा उपयोग करून देव तुमच्या अंतःकरणाची पारख करितो. तुम्ही अशा लोकांवर प्रीती करीत नाही तर समजावे की तमु च्यामध्ये देवाचा स्वभाव नाही. कारण देवाचा स्वभाव शत्रूवं र प्रीती करण्यास आपल्याला प्रवृत्त करितो. येशूचा तर यहूदा इस्कारियतचे बरे करण्याकडे कल होता.

सर्वांचे बरे व्हावे अशी देवाची इच्छा आहे. शुभवर्तमानाचा संदेश हा आहे की आपण देवाच्या स्वभावाचे वाटेकरी व्हावे.