WFTW Body: 

1 थेस्सलनी 4:1-8 मध्ये पालै लॆंगिक शद्धुतेविषयी सांग्तो. 1 थेस्सलनी 4:4 दोन संभाव्य पद्धतींनी भाषातंरीत केल्या जाऊ शकते. ''पात्र'' हा शब्द एकतर आपल्या देहाकरिता किंवा आपल्या पत्नीकरिता संदर्भीत केल्या जातो.

म्हणून, ''तर पवित्रतेने व अब्रूने तुम्हातील प्रत्येकाने आपल्या देहावर ताबा कसा ठेवावा हे समजून घ्यावे''. आपण आपल्या देहाला पवित्र व शुद्ध ठेवण्यास शिकावे कारण देवाची अशी इच्छा आहे की आपले पवित्रीकरण व्हावे (1 थेस्सलनी 4:3). अनेक क्षेत्रात देवाची इच्छा काय आहे याविषयी आपल्याला अनके दा कळत नाही. परंतु, या क्षेत्रात आपल्याला देवाच्या इच्छेविषयी स्पष्टपणे कळते. पवित्र होणे म्हणजे सर्व पापमय गोष्टींपासनू , जगीकतेपासून व ख्रिस्तासारखे न होणे यापासनू आपण विभक्त व्हावे. अशा सर्व दुष्टतेपासून आपण स्वतःच्या देहाला अलिप्त ठेवण्यास शिकलेच पाहिजे.

1 थेस्सलनी 4:4 ह्याचा असा अर्थ होतो की प्रत्येकाला हे कळावे की त्याने आपली पत्नी पवित्रतेत व मानाने कशी प्राप्त करावी. ह्याचा अर्थ असा की तुमच्या पत्नीला मिळविण्याची पद्धत ही पवित्र व शुद्ध असावी. लोक अनेक अपवित्र मार्गांनी पत्नी मिळविण्याचा प्रयत्न करितात. हुंडा मागणे त्यापैकी एक अपवित्र पद्धत आहे. अपवित्र मार्गांनी तुम्ही पत्नीचा शोध घते आहात का? की पत्नीची निवड करीत असताना तिच्या जगीक शिक्षणाकडे बघता? कामवासनेने पत्नीकडे बघणे म्हणजे परराष्ट्रीय लोक जसे बघतात तसे बघणे होय. परंतु, जर तुम्हाला देवाची सेवा करायची आहे तर ज्याप्रकारे तुम्हामध्ये दैवी इच्छा आहेत तशाच दैवी इच्छा असणारी पत्नी तुम्ही शोधावी.

1 थेस्सलनी 4:6 मध्ये पौल पुढे असे म्हणतो, ''कोणी ह्या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये''. ह्याचा अर्थ असा की ''कोणीही दुसर्याच्या पत्नीसाबे त अधिक मॆत्री करू नये'' कारण ''प्रभु या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे''. विभिन्न लिंगी व्यक्तीसोबत वागताना आपण दक्षतेने वागावे, कारण आज आपण ज्या समाजात जगत आहोत तो समाज थेस्सलनीच्या काळातील लोकांसोबत साम्य आहे. तेथे लैंगिक अनैतिकतेला पाप समजल्या जात नव्हते. दुःखाची बाब अशी आहे की आज मंडळ्यांतील तरुणांमध्ये व ख्रिस्ती कर्मचार्यांमध्ये अनैतिकता आढळत आहे. ख्रिस्ती या नात्याने आपण जगापासून भिन्न असणे महत्वाचे आहे व या क्षेत्रात आपली साक्ष स्पष्ट व चांगली असावी. या क्षेत्रात आपल्या शरीराला शुद्धतते कसे राखावे हे आपण शिकले पाहिजे. अन्यथा, आपण याद्वारे देवाच्या नावाची निंदा करू. शमशाने व दावीद हे देवाला जाणत असताना देखील या क्षेत्रातील त्यांच्या दुःखदायक उदाहरणामुळे अपयशी झाले. आज त्यांच्यासारखे अनेक लोक समाजात आहेत.