WFTW Body: 

यशयाच्या 6 व्या अध्यायात यशयाने सिंहासनाचे व वेदीचे दर्शन पाहिले. नंतर प्रभू त्याला म्हणाला, ''मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हां मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठीव'' (यशया 6:8).

आपण सिंहासन व वेदीला सतत बघावे. हे फार गरजेचे आहे. देवाच्या पवित्र दर्शनाने आपण प्रथम धूळ झटकून घेण्याची गरज आहे आणि नंतर स्वतःला वर उचलण्याची गरज आहे कारण वेदीवरील रक्ताद्वारे आपण शुद्ध झालो आहोत. तेव्हाच आपण पुढे जाऊ शकतो व देवाची सेवा करू शकतो. जर दवे आपल्याला पाठवीत नाही तर आपण पुढे जाऊच शकत नाही. देवाच्या पाचारणाशिवाय जर आपण पुढे जातो तर आपले श्रम व्यर्थ ठरतील

अनेक ''ख्रिस्ती कर्मचार्यांना'' देवाचे पाचारण नसते व देवाने त्यांना पाठविलेले नसते. काही संस्थांनी किंवा लोकांनी त्यांना सेवाक्षेत्रात पाठविलेले असते किंवा कदाचीत ते स्वतःच गेलेले असतात. गरज फार मोठी असल्यामुळे खिस्र् ती सेवाकार्यात स्वतःला सहभागी करून घेणे सोपे आहे. परंतु, सार्वकालिकतके रिता टिकणार्या फळाची जर आपण इच्छा बाळगतो तर आपल्याला देवाने स्वतः पाठविलेले असणे गरजेचे आहे. आपल्याला देवापासून मिळालेल्या पाचारणाची अन्य दवे भीरू लाके खात्री देऊ शकतात; परंतु, ते आपल्याला पाचारण देऊ शकत नाहीत

देवने स्वतः शौलाला व बर्णबाला त्याच्या सवे के रिता पाचारण दिले. त्या पाचारणाची खात्री नतं र अन्य संदेष्टचंद्वारे झाली (प्रेषित 13:1-4). जेव्हा देव आपल्याला पाचारण करितो तेव्हा काय संदेश द्यायचा हे देखील तोच आपल्याला सांगतो. त्याने यशयाला सांगितले, ''जा, या लोकांना सांग... '' (यशया 6:9).

यशयाच्या काळातील देव आज देखील तसाच आहे. नवीन कराराच्या अंतर्गत पवित्र आत्मा आपल्या हृदयात वसतो म्हणून आपल्या शारीरिक कानांनी आपण देवाची वाणी एके त नाही, जशी यशयाने त्याच्या काळात एके ली होती. आज देवाची वाणी आपल्याला आपल्या अंतःकरणात ऐकू येते. परंतु, त्याची वाणी अयोग्य नाही. मी कधीही माझ्या शारीरिक कानांनी देवाची वाणी ऐकली नाही आणि देवाला किंवा देवदूताला माझ्या शारीरिक डोळ्यांनी बघितले नाही; परंतु, मागील 50 वर्षांमध्ये मी अनेकदा माझ्या अंतःकरणात देवाला बघितले व त्याची वाणी स्पष्टपणे ऐकली आहे.

येशूने म्हटले की, त्याला शारीरिक डोळ्यांनी न बघता जे विश्वास ठेवितात ते त्याला बघून विश्वास ठेवणार्यांपेक्षा धन्य आहेत (योहान 20:29).

परमेश्वराने जी सेवा यशयाला दिली होती ती कठीण होती. देव यशयाला म्हणाला, ''जा, या लोकांस सांग की ऐकत राहा पण समजू नका, पाहत राहा, पण जाणू नका, ह्या लोकांना डोळ्यांनी पाहून, कानांनी ऐकून व मनाने समजून मजकडे वळून सुधारू नये म्हणून त्यांचे हृदय जड कर, त्यांचे कान बधिर कर व त्यांचे डोळे चिपडे कर'' (यशया 6:9-10). दाखल्याद्वारे लोकांना समजावीत असताना या वचनाचा येशूने संदर्भ घेतला (मत्तय 13:15).

तर तुम्ही इथे काय पाहता? देवाचे दर्शन, स्वतः विषयीचे दशर्न , क्षमा करणार्या कृपेचे दशर्न , अभिषिक्त सेवेचे दशर्न आणि शवेटी फळाचे दर्शन (यशया 6:13). भ्रष्ट राष्ट्र यहूदातून पवित्र अंकूर येईल. आपल्या सेवेद्वारे शुष्क अस्थी प्रभूकरिता उभ्या होतील