लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   मंदिर
WFTW Body: 

जगापासून विभक्ती हा नवीन कराराचा महत्वाचा विषय आहे. वधस्तंभावर जाण्यापूर्वी येशूने आपल्या शिष्यांना सांगितले की ते या जगाचे नाहीत. येशू स्वतः या जगाचा नव्हता. येशूने शिष्यांना खात्री करून दिली की ते एका वेगळ्या जगाचे आहेत. म्हणूनच येशूने त्यांना सांगितले की या जगामध्ये त्यांना जगणे अवघड वाटेल (योहान 15:19; 17:16).

शिष्यांची जबाबदारी आहे की त्यांनी स्वतःला जगापासून वेगळे ठेवावे व आपल्या वस्त्रांवर जगाचा डाग लागू देऊ नये (याकोब 1:27). मंडळी ही ख्रिस्ताची वधू आहे. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली, तिला आपल्याकरिता मिळविले व पवित्र केले (इफिस 5:25-27). यातून दिसते की करिंथ येथील विश्वासणार्यांचा पौल 'दैवी हेवा' करीत आहे. ख्रिस्ताकरिता तो मंडळीला शुद्ध ठेऊ इच्छितो म्हणूनच त्याला भिती होती की सैतानाने मंडळीला भ्रष्ट करू नये (2 करिंथ 11:2,3).

याकोबानेसुद्धा जगाच्या आत्म्यासोबत मैत्री करणार्या विश्वासणार्यांना ''देवाचे वैरी'' म्हटले आहे (याकोब 4:4). होय, विभक्तीविषयी बायबल पुष्कळ काही सांगते.

लक्षात ठेवा की, बायबलच्या मते विभक्ती म्हणजे अंतराची विभक्ती नव्हे. जगातील लोकांपासून शारीरिक व बाह्य विभक्तीविषयी पौल बोलत नाही तर अंतःकरणाच्या विभक्तीविषयी बोलतो. अनेकांना वाटते की संन्यासी लोकांप्रमाणे अरण्यांत जाऊन राहणे, जगातील लोकांपासून दूर जाणे म्हणजेच देवाजवळ जाणे होय किंवा देवाला जवळ करणे होय. भिक्षू किंवा नन ह्यांनी स्वतःला लोकांपासून विभक्त केले, ते एकांतात राहतात; परंतु त्यांना त्या विभक्तीचा अर्थ कळला नाही ज्या विभक्तीविषयी बायबल शिकविते. बायबलमधील विभक्तीचा अर्थ असा नाही की आपण पांढरे शुभ्र कपडे घालावे किंवा विशिष्टप्रकारचा पेहराव करावा. येशूने असे करण्यास सांगितले नाही किंवा अशा बाह्य गोष्टी केल्या नाही. जगाच्या आत्म्यापासून सुटकेविषयी येशूने शिक्षण दिले. येशू आपल्यामध्ये जगात असताना जगिक आत्म्यापासून विभक्त राहिला.

आपण एका परग्रहावर आहोत. जहाज समुद्रामध्ये तरंगत असते, जहाजाच्या चारही बाजूला अथांग पाणी असते तरी देखील समुद्राचे पाणी जहाजामध्ये शिरत नाही. विश्वासणारे जेव्हा अशा जहाजाप्रमाणे असतात तेव्हा त्यांना जगाचा सामना तर करावा लागतो; परंतु ते जगाचे होत नाहीत. येशूने सांगितले आहे की जगामध्ये आपल्याला त्रास होणार कारण आपण जगाचे नाही (योहान 16:33). जर विश्वासणार्याचे नागरीकत्व स्वर्गाचे आहे तर जग त्याचे नाही. तो जगाचा रहिवासी नाही. पाण्याच्या बाहेर असलेल्या मासोळीप्रमाणे विश्वासणारा असतो म्हणून त्याला जगात जगणे कठीण जाते. चमत्काराद्वारेच मासोळी पाण्याबाहेर राहू शकते. तसेच ख्रिस्ताची खरी मंडळी चमत्काराद्वारेच पृथ्वीवर जगू शकते. अशाप्रकारचे ख्रिस्ती जीवन देवाने आपल्याकरिता ठेवले आहे. रोज आणि रोज आपण देवाच्या अद्भुत चमत्कारावर विसंबून राहतो व त्याच्या सामर्थ्याद्वारेच जीवन जगतो.

देवाची इच्छा आहे की त्याच्या लोकांमध्ये व जगाच्या आत्म्यामध्ये मोठ्या वाळवंटाइतके अंतर असावे. ही विभक्ती स्वर्ग आणि नरकामध्ये आहे इतकी असावी (लूक 16:26). वाळवंटामध्ये पूल बांधता येत नाही. आपल्या लोकांकरिता देवाची नेहमीच इच्छा होती व आहे की त्यांनी जगाच्या आत्म्यापासून मुक्त असावे. अनेक विश्वासणार्यांना हा बोध कळलेला नाही किंवा हे सत्य समजलेले नाही. म्हणूनच अनेक विश्वासणारे शक्तीहीन व अस्वस्थ जीवन जगतात