WFTW Body: 

प्रकटी 2 व 3 मध्ये देवाने दोष लावलेल्या पाच संदेशवाहकांकडे व मंडळ्यांकडे आपण बघतो तेव्हा आपण त्यांना खाली पडलेले बघतोः

1.इफिसमध्येआपणबघतोकीत्यांनीदेवाप्रतीअसलेलीत्यांचीपहिलीप्रीतीसोडली.जेव्हाआपणख्रिस्ताप्रतीआपलेसमर्पणगमावतोतेव्हा आपणखालीपडण्याकडेपहिलेपाऊलउचलतो.काहीवेळातचयामुळेआपणआपल्यासहविश्वासणार्यांप्रतीदेखीलआपलीप्रीतीगमावतो.

2. पर्गममध्ये आपण बघतो की जगिकता ही बलामाच्या शिक्षणाद्वारे हळू हळू दुष्ट हेतुने प्रवेश करिते. इफिसच्या मंडळीबाहेर ज्या निकोलाईटलोकांनाठेवण्यात आले होतेत्यांना याठिकाणीबळ मिळाले. जेव्हा ख्रिस्ताप्रतीआपण आपले समर्पण गमावतो तेव्हा जगिकता मंद पावलानेआत येतेव धार्मिकतेचेढोंग घेऊन मंडळीवर प्रभुत्वकरिते. जरजगिकता मंडळीच्यापुढार्यांवर धार्मिकतेच्याढोंगाच्या रूपात प्रभुत्व घेते तर बाबेल सहजपणे बांधल्या जाते.

3. थुवतिरा मध्ये मंडळी पूर्णपणेजगिक बनलीहोती त्याचा परिणाम असाझाला की धार्मिक व्यभिचारालावेग मिळाला. मंडळीला प्रभावीत करण्याचे सामर्थ्य स्त्री मध्ये आले आणि ती खोट्या कृपेचा व आत्म्याच्या खोट्या फळांचा देखील प्रसार करू लागली (विशेषेकरून भविष्यवाणी करण्याच्या दानाचा).

4. सार्दीसमध्ये आपण ढोंगीपणा बघतो. पाप झाकल्या गेले आणि देवाच्या मतापेक्षा मनुष्याच्या मताला अधिक महत्व देण्यात येऊ लागले. मंडळीचे संदेष्टे आत्मिकरित्या झोपलेले होते (ते आध्यात्मिक वास्तविकतेविषयी अजानहोते). धार्मिकतेचे ढोंग मनुष्याच्या दृष्टीपासून लपू शकते परंतु प्रभु त्यांना आत्मिकरित्या मृत बघतो

5. लावदिकीयामधील मंडळीची नैतिक मूल्ये इतक्या खालच्या पातळीवर पोहंचली होती की त्यांचे शरीर केवळ मृतच पावले नव्हते तर ते सडू लागले होते व त्यातून दुर्गंधी येऊ लागली होती. कोमटपणा व धार्मिक अहंकार हे या मृत्युचे कारण आहे. वरील चारही मंडळ्यांमध्ये काही थोड्या गोष्टी चांगल्या आढळून येत होत्या व प्रभु देखील त्यांच्या जीवनात त्या बघू शकत होता. परंतु याठिकाणी लावदिकीयामध्ये त्याला काहीच चांगले दिसले नाही.

वरील मंडळ्यांचे एकही दूत त्यांच्या स्वतःच्या जीवनाच्या किंवा मंडळीच्या जीवनाच्या खर्या आध्यात्मिक स्थितीविषयी जागरूक नव्हते. त्या सर्वांचे स्वतःविषयी उच्च मत होते व त्यात ते समाधानी होते. प्रभुला त्यांच्याशी वैयक्तीकपणे काय बोलायचे आहे हे ते ऐकू शकत नव्हते. कारण ते सर्व दुसर्यांना प्रवचन देण्याकरिता संदेश तयार करण्यात व्यस्त होते. स्वतःची गरज काय आहे हे बघण्यापेक्षा त्यांना उपदेश देण्यात अधिक आवड होती. एकदा का कोणी व्यक्ती मंडळीचा संदेशवाहक बनला तर त्याला वाटते की सुधारणुकीची त्याला गरज नाही. ह्याची कल्पनाच तो करू शकत नाही. बायबल सांगते, ''अधिकाधिक बोध ग्रहण करण्याचे कळत नाही अशा वृद्ध पण मूढ राजापेक्षा गरीब पण शहाणा तरुण बरा'' (उपदेशक 4:13).

वरील पाचही मंडळीचे दूत त्या मूर्ख राजासारखे होते. त्यांचे शब्द नियम बनले होते त्यामुळे चुकण्याच्या शक्यतेविषयी ते कल्पनाच करू शकतनव्हते. त्यांचीपरिस्थिती अशीफसवी किंवाचुकीच्या मार्गानेनेणारीझालीहोती. त्यांनावाटत होतेकी त्यांच्याजीवनाकरिता देवाचा अभिषेक ते कधीच गमावणार नाहीत. परंतु त्यांच्या अहंकारी वृत्तीमुळे ते आध्यात्मिकरित्या मृत झाले.

देव पक्षपात करीत नाही आणि तो विशेष व्यक्तीवर विशेष कृपा करीत नाही. प्रेषित पौलाला देखील हे समजले होते की जर तो त्याच्या जीवनाप्रती नियंत्रीतपणे वागला नाही किंवा त्याबद्दल त्याने दक्षता बाळगली नाही तर तो देखील पसंतीस न उतरलेला ठरेल व पडेल (1करिंथ9:27).पौलाने तीमथ्यालासांगितले,''आपणाकडेव आपल्याशिक्षणाकडे नीटलक्षठेव;त्यांतचटिकूनराहा; कारणअसेंकेल्यानें तूं स्वतःचें व तुझें ऐकणार्याचेंहि तारण साधिशील'' (1 तीमथ्य 4:16). तीमथ्याला सर्वप्रथम त्याच्या जीवनाकडे नीट लक्ष ठेवायचे होते. नंतरच त्याला तारण साधणार होते आणि तेव्हाच तो इतरांना तारणाकडे नेण्यास पात्र होणार होता. हीच पद्धत प्रभुने प्रत्येक मंडळीतील त्याच्यादूतांकरिता ठरविलीआहे. इफिस येथील मंडळीतीलवडीलजनांना पौलसांगतो कीत्यांनी आपल्याजीवनाकडे सर्वप्रथमनीट लक्ष द्यावे व नंतर कळपातील सर्वांकडे नीट लक्ष द्यावे (प्रेषित 20:28).

प्रभुच्या प्रत्येक दूताची ही जबाबदारी आहे की त्याने स्वतःचे जीवन शुद्धतेत राखावे आणि आत्म्याच्या निरंतर अभिषेकात त्याने राहावे, ''तुझी वस्त्रे सदा शुद्ध असोत; तुझ्या डोक्याला तेलाची वाण नसो'' (उपदेशक 9:8).