नकली संजीवन

लेखक :   झॅक पुननं
Article Body: 

येशूने व प्रेषितांनी वारंवार ताकीद दिली आहे की शेवटल्या दिवसांमध्ये फसवणूक होईल व अनेक खोटे संदेष्टे उत्पन्न होतील (मत्तय 24:3-5, 11,24; 1 तीमथ्य 4:1). मागील काही दशकांपासून आपण अनेक खोटे शिक्षक पाहत आलो आहोतहजारोंच्या संख्येने ख्रिस्ती विश्वासणारे खोटा संदेष्टांद्वारे व नकली संजीवनांद्वारे का फसविले जात आहेत?

अनेक प्रचारक अनैतिकता व लोभाच्या मागे का लागले आहेत? यामागील मला दिसलेली काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत :

1. जुन्या करारामध्ये जे शिकविले आहे त्याविषयी बहुतेक ख्रिस्ती विश्वासणारे जागृत नाहीत, कारण त्यांनी नवीन कराराचा अभ्यास काळजीपूर्वक केला नाही. त्यामुळेच ते नवीन कराराच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगण्याऐवजी खोटा पुढार्‍यांच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगतात.

2. जीवनातील 'शीला' ऐवजी (अलौकीक जीवनाऐवजी) ते चमत्कारांना (अलौकीक दानांना) अधिक महत्व देतात.

3. आत्मिक श्रीमंतीपेक्षा त्यांना भौतिक श्रीमंती महत्वाची वाटते.

4. खर्‍या आत्मिक गोष्टी व भावनात्मक मानसिकतेमध्ये त्यांना फरक लक्षात येत नाही. त्यांना खर्‍या रीतीने पवित्र आत्म्याद्वार े झालेले कार्य समजत नाही, कारण, त्यांनी नवीन कराराच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले आहे.

5. मानसिक आरोग्य (मनाच्या योग्य वृत्तीमुळे मिळणारे आरोग्य) व ख्रिस्ताच्या नावामध्ये मिळणारे अलौकीक आरोग्य यामधील फरक त्यांना कळत नाही.

6. प्रभुने दिलेल्या हृदयातील खर्‍या आनंदापेक्षा त्यांना भावनात्मक उत्साहाचे व विचित्र शारीरिक बदलांचे अधिक महत्व वाटते.

7. पुढार्‍यांना देवासोबतच्या आंतरीक वाटचालीपेक्षा लोकांमधील सेवा अधिक महत्वाची वाटते.

8. देवाच्या मर्जीपेक्षा ह्या पुढार्‍यांना लोकांच्या मर्जीचे अधिक महत्च वाटते.

9. ख्रिस्ताप्रती लोकांच्या पूर्ण समर्पणापेक्षा ह्या पुढार्‍यांना सभेंमधील लोकांची संख्या अधिक महत्वाची वाटते.

10. स्थानिक मंडळी रोपणापेक्षा व स्थानिक मंडळीमध्ये पुढारीपण करण्यापेक्षा या खोटा पुढार्‍यांना स्वत:चे राज्य स्थापण्याचे व आर्थिक साम्राज्य बनविण्याचे अधिक महत्व वाटते (यिर्मया 6:13). वरील सर्व गोष्टी येशूच्या शिकवणीच्या अगदी विरोधात आहेत. नवीन करारामध्ये सांगितले आहे की जे सर्व येशूच्या विरोधात.

आहेत ते ''ख्रिस्त विरोधी'' आहेत. जर ख्रिस्ती लोकांना या गोष्टी स्पष्ट दिसत नाहीत तर ख्रिस्त विरोधक जेव्हा जगातील मंचावर उभा राहील व खोटे चिन्ह चमत्कार करील (2 थेस्सलनी 2:3-10) तेव्हा हे लोक डोळे बंद करून त्याचा स्वीकार करतील.

खरोखर प्रभु येशू ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे चालणे म्हणजे वरील दाही मुद्यांच्या विरुद्ध चालणेमत्तय 7:13-27 मध्ये येशूचे शब्द दिलेले आहेत (त्यासोबतच मत्तयाचे 5-7 अध्याय वाचावे).

''दोन दारांपैकी सार्वकालिक जीवनाचे दार फार अरूंद आहे''- मी यापूर्वी सांगितले आहे (मत्तय 5-7). परंतु, खोटे संदेष्टे येतील व ते तुम्हाला सांगतील की दार व मार्ग अरूंद नाही; परंतु, रूंद आहे व सोपा आहे. त्यांच्यापासून सावध असा. त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना सहज ओळखू शकाल.

त्यांचे जीवन क्रोधरहीत, वासनारहीत पैशाचा लोभरहीत व भौतीक श्रीमंतीचा लोभरहीत आहे का? ते जगातील लोकांसारखे तर वागत नाही. मी शिकवीत असल्या्रपमाणे ते जगातील या वाईट मोहांविरुद्ध शिकवितात का?

(मत्तय 5:21-32 व 6:24-34). हे खोटे संदेष्टे अलौकीक दान दाखवीत असतील व चमत्कार करीत असतील, ते माझ्या नावाने रोग बरे करीत असतील. परंतु, मी त्यांना शेवटच्या दिवशी नरकात पाठवीन कारण त्यांनी मला ओळखले नाही. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनातील पापाचा त्याग केला नाही (मत्तय 7:21-23). यामुळे जर तुम्हाला सदासर्वकाळ टिकणारी, कधी न हालणारी खडकावरील मंडळी स्थापायची आहे तर तुम्ही त्या गोष्टींपासून दूर राहा ज्याविषयी मी ताकीद दिली आहे व मी सांगितलेल्याच गोष्टी करा (मत्तय 5्र-7). तुम्ही तुमच्या लोकांना मी आज्ञापिले ते करण्यास शिकवा. मग मी तुमच्यासोबत असेनमाझा अधिकार तुम्हाला साहाय्य करील (मत्तय 28:20, 18). परंतु, मी सांगतो ते तुम्ही ऐकून त्याप्रकारे करीत नाही तर तुमची इमारत मोठी दिसेल व लोकांना आकर्षित करेल; परंतु, एके दिवशी ती जमीनदोस्त होईल (मत्तय 7:25).

मग या शेवटल्या दिवसात आम्ही न हालणारी मंडळी कशी स्थापणार?

1. आपण डोंगरावरील येशूच्या प्रवचनाप्रमाणे जीवन जगावे व ते प्रवचन शिकवीत राहावे.

2. आपण जुन्या कराराप्रमाणे नव्हे तर नवीन कराराप्रमाणे जीवन जगावे. याकरिता आपल्याला दोन्ही करारातील फरक स्पष्ट कळावा (2 करिंथ 3:6).

आपण नवीन करार देखील शिकवावाआज जेव्हा पुढारी लोक घोर पापात पडतात तेव्हा ते जुन्या करारातील थोर पुरुषांचे उदाहरण देतात जे पापात पडले होते. काही काळ शांत राहिल्यावर ते परत आपली सेवा सुरू करतात. व्यभिचारात पडलेल्या दाविदाचे ते उदाहरण देतात.

निराश झालेल्या एलीयाचे ते उदाहरण देतात. ते म्हणतात, ''जुन्या करारातील थोर पुरुषांनी चुका केल्यावर देखील देवाने त्यांचा उपयोग करून घेतला.'' हे पुढारी कधीही पौलाच्या शेवटपर्यंतच्या विजयी जीवनाचे व शुद्ध जीवनाचे उदाहरण देत नाहीत. या प्रचारकांना किंवा पुढार्‍यांना कळत नाही की आजच्या काळाकरिता काळाकरिता जुन्या करारातील थोर पुरुष आपल्याकरिता उदाहरण नाही.

या कृपेच्या काळामध्ये आपल्याला अधिकप्राप्त झाले आहे. ''ज्यांना अधिक दिलेले आहे त्यांच्याकडून अधिक मागण्यात येईल'' (लूक 12:48). येशूच नवीन कराराचा मध्यस्थ आहे, तोच आपल्याकरिता उदाहरण आहे, आजच्या आपल्या विश्वासाचा लेखक तोच आहे - दाविद किंवा एलीया नव्हे. जुन्या करारातील संत पुरुष (इब्री 11 मध्ये यादी दिलेली आहे) व येशूमधील फरक इब्री 12:1-4 मध्ये स्पष्ट दिला आहे. फार थोडके लोक या वास्तविकतेप्रमाणे जीवन जगतात. नवीन करारामध्ये देवाने आपल्याला अधिक चांगले ते पुरविले आहे हे पुष्कळांना दिसत नाही (इब्री 11:40).

जर आपण सावध नसलो व जागृत नसलो तर या पुढार्‍यांप्रमाणे आपल्यातील कोणीही पापात पडू शकतो - कारण सैतान धूर्त शत्रु आहे. नवीन कराराच्या शिकवणीप्रमाणे आपण वागलो तर आपण सुरक्षित आहोत. आपले पुढारीपण खरोखर समर्पित राहील (समर्पित पुढारीपण म्हणजे सुरुवातीला मी दिलेल्या दहा मुद्यांपैकी एकासारखेही आपण उणे नसावे). इतरांच्या चुकांद्वारे जर आपण शिकतो तर त्याच चुका आपण करणार नाहीआपण आपले मुख सदासर्वदा प्रभुसमोर मातीत झाकावे, कारण त्याच ठिकाणी आपल्याला दैवी प्रगटीकरण लाभेल (प्रगटीकरण 1:17). जर आपण स्वत:ला नम्र केले तर विजयी होण्याकरिता आपल्याला कृपा प्राप्त होईल (1 पेत्र 5:5).

पवित्र आत्मा जेव्हा आपल्याला देवाच्या वचनातील सत्य दाखवितो व आपल्याविषयीचे सत्य दाखवितो तेव्हा आपण पूर्णपणे प्रामाणिक असावे व सत्यावर प्रीती करावी जेणेकरून सर्व पापापासून आपण तारल्या जाऊ. ह्याचप्रकारे आपण सर्व फसवणुकीपासून देवाच्या साहाय्याने सुरक्षित राहू (2 थेस्सलनी 2:10,11).